अन्नछत्र
श्री. अन्नपूर्णा माता अन्नछत्र, श्री. क्षेत्र कडेपठार, जेजुरी.
श्री. कडेपठार महाराजांच्या कृपाशीर्वादाने श्री. खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी यांच्याकरवी श्री. कडेपठार महाराज करुवून घेत असलेल्या अन्नदान सेवेचा प्रारंभ माजी जिल्हा न्यायाधीश तसेच माजी सह धर्मादाय आयुक्त, पुणे श्री. व सौ. दिलीपरावजी देशमुख साहेब, डॉ. राजेंद्रजी खेडेकर आणि डॉ. अजयजी कुलकर्णी आणि. डॉ. देवयानी यांच्या हस्ते अत्यंत भक्तिमय वातावरणात अन्नदान सेवा अखंडित चालू ठेवण्याचा दृढ संकल्प करून तसेच श्री. माता अन्नपूर्णा देवीचा अभिषेक श्री. खंडोबा म्हाळसाई देवीची महापूजेचे आयोजन श्री. नांदुकाका आगलावे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. आलेल्या भाविकांनी मनोभावे महाप्रसादाचा लाभ घेतला आणि भरभरून आशीर्वाद दिले.
दरम्यान माजी. सह धर्मादाय आयुक्त श्री. देशमुख साहेब यांनी न्यास व्यवस्थापन आणि गडाच्या विकास कामाबाबत मार्गदर्शन करून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे त्यांच्या संकल्पित गोष्टींपैकी पायरीमार्ग दुरुस्ती आणि अन्नदान सेवा सुरु झाल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला. सौ देशमुख मॅडम यांनी अन्नदान सेवा हि अखंडित आणि अबाधित चालू राहावी यासाठी श्री. खंडेराया चरणी पुनः पुनः मनोभावे प्रार्थना केली आणि उपक्रमास प्रोत्साहन दिले.
डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी गडाची उंची,एवढ्या दूर तात्काळ वैद्यकीय सेवेचा अभाव लक्षात घेता न्यासास एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सह इतर वैद्यकीय उपकरणे भेट म्हणून दिली आणि त्याचा वापर करण्याची पद्धत देखील सोप्या भाषेत समजावून सांगितला. त्याचप्रमाणे पुढे त्यांनी गडावर प्रत्यक्ष डॉक्टरांसह मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे आश्वासन दिले.
त्याचप्रमाणे डॉक्टर अजयजी कुलकर्णी यांनी अन्नदानसेवा सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून हि सेवा अखंडित सुरु राहिली पाहिजे आणि त्यासाखी कोणतेही सहकार्य लागल्यास मागे हटणार नाही असा भक्कम आधार देऊन मनोधैर्य वाढविले.
कार्यसिद्धीस प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्यांचे मनापासून धन्यवाद !
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ।
ज्ञान वैराग्य सिध्यर्थं भिक्षां देहिच पार्वति ॥
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥