मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने सप्तऋषींच्या विनंतीवरून श्रीमार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. भगवान शंकर व आदिमाया शक्तीने तेहतीस कोटि गण व देवसेनेसह युद्धासाठी भूतलावर पदार्पण केले ते धवलगिरीच्या पठारावर, तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा. या ठिकाणी अवतरल्यानंतर गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली आणि विनंती केली की "या भूमीवर लिंग रूपाने आपण सदैव राहावे." सर्वांचे मनोरथ पूर्ण करणा-या मार्तंड भैरवाने तथास्तु म्हंटले व धवलगिरीवर द्विलिंग रूपात प्रकट झाले. आज कडेपठार तो मूळचा धवलगिरी, युद्धासाठी येथून प्रस्थान ठेवल्यानंतर काही काळ याला प्रस्थपीठ म्हणूनही संबोधले जात होते.
पहाटे ५:३० वाजता
भूपाळी: मंदिर दररोज पहाटे ५:३० वाजता उघडते, मंदिर उघडल्यानंतर विधीपूर्वक देव उठऊन देवाची भूपाळी गात महापूजाविधी होऊन महाआरती केली जाते.